औसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अलीशेर कुरेशी व स्वीकृत सदस्यपदी रूपेश दुधनकर यांची नियुक्ती


मुख्तार मणियार

औसा/प्रतिनिधी:
औसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मेहराज शेख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक अलीशेर कुरेशी यांची तर स्वीकृत सदस्यपदी रुपेश दुधनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. औसा नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख तथा पीठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विडीयो कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.सदर सभेत १६ सदस्य उपस्थित होते. उपाध्यक्षपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली.यात अलीशेर मुसामियॉ कुरेशी यांचे एकमेव नामनिर्देशित पत्र वैद्य असल्याने औसा नगरपालिकांचे उपनगराध्यक्ष पदावर निवडून आल्याने पीठासन अधिकारी यांनी जाहीर केले. तर स्वीकृत सदस्य निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रुपेश दुधनकर यांचे नामनिर्देशित पत्र जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे प्राप्त झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाच्या वतीने रुपेश दुधनकर यांचे स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे पीठासन अधिकारी  नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी जाहीर केले.

 या विशेष सभेस नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ,नगरपालिकेचे नगरसेवक अलिशेर कुरेशी, मुजाहिद शेख, गोविंद जाधव ,परवीन शेख,  जावेद शेख, मेहराज शेख, रूमा काझी, कीर्ती बाई कांबळे, नजमुनबी इनामदार, जहॉरा तत्तापुरे, अंगद  कांबळे ,मंजुषा हजारे, सुनील उटगे, उन्मेश वागदरे, सुहास डेंग आदी उपस्थित होते.