पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली सोन येथे आ. अभिमन्यू पवार व भाजपाचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ग्रामपंचायतचा ध्वज फडकाऊन वृक्षारोपन कार्यक्रम पार पडला. गावचे उपसरपंच अरूण देशमुख ,ग्रामसेवक पाटील ,तालुका सचिव गजेंद्र डोलारे ,बुथ प्रमुख निळकंठ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पितांबर पांचाळ, हणमंत साठे, भगवान गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राम भोसले, राम पांचाळ ,आदित्य देशमुख ,तानाजी नागाळे ,आकाश भोसले ,आतूल भोसले ,वाघंबर जाधव, खंडू इंगळे ,दत्ता शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम कार्याचा गौरव करण्यात आला.