
संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी:
गरजूंना साड्या,सॅनिटायझर,आर्सेनिक अल्बम गोळ्या,मास्क,मिठाई वाटप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकलूज भाजपा व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अकलूजमध्ये आंबेडकर चौक,रमामाता चौक, रामबाग चौक, जुना बाजार तळ,( विजय चौक) याठिकाणी गरजू महिलांना जिल्हा भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकर चौकातून करण्यात आली. प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. वाटपाची सांगता जुना बाजार तळ (विजय चौक) येथे झाली. या वाटपामध्ये ७० साड्या ७० सॅनिटायझर ७००० हजार लोकांना पुरेल एवढे आर्सेनिक एल्बम गोळ्या, ७०० मास्क ,फळे , मिठाईमध्ये ७० किलो जिलेबी आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे आयोजक माळशिरस तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष डॉ .अक्षय वायकर व अकलुज शहराध्यक्ष महादेव कावळे, यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी जिल्हा भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुख्क्तार (भाई )कोरबु , भाजपाचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे, डॉ . मोर्चाचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रवीण सिंह पातळे- पाटील,, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका उपाध्यक्ष डॉ. अक्षय वायकर ,भाजपा उपाध्यक्ष अकलूज शहर शेखर माने ,भाजपा युवा अध्यक्ष अकलूज शहर बंडू खंडागळे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीकांत दोरकर, अल्पसंख्याकी महिला मोर्चा तालुकाध्यक्षा लैला बी नदाफ, सुनिता साठे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम म्हणून मनोज साळुंखे, शिवराज शिंदे, नंदकुमार दोरकर, अर्जुन दोरकर ,निखील देवकर, विक्रम साठे, सागर काळे, अरविंद कांबळे, सतीश दोरकर ,शैलेश दोरकर ,अभिजीत सुरवसे ,सुधीर नवगन,आदेश पिसाळ ,शुभम सूर्यवंशी, लखन गायकवाड,
भय्या चंदनशिवे,लक्ष्मण सदाफुलें,संजय खंडागळे,तात्या लोखडे,छोट्या सावंत सह कार्यकर्त्यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येकाने मास्क घालून सेनि टायझरचा वापरही करण्यात आला होता.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन