
दिघंची/प्रतिनिधी:
लिंगीवरे येथील गोयाबा बनामध्ये कृषिकन्या शिवानी यादव हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी. हाॅर्टीकल्चर अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेली कृषिकन्या शिवानी संजीवकुमार यादव हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत लिंगीवरे येथे वृक्षारोपण करून त्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या शिवानी यादव हिने लिंगीवरे गावातील गोयाबा मंदिरासमोर आंबा,चिंच या झाडांचे वृक्षारोपण केले. ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संगोपन आवश्यक असल्याचे सांगितले. आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पुजारी,लिंगीवरे ग्रामपंचायतीचे सरपंच विराज पुजारी,उपसरपंच मनोज खटके,सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी हणमंतराव गुरव, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक धर्मराज यादव,बाबासाहेब पुजारी, उत्तमराव ठोंबरे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश