
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
जत तालुक्यातील अचकनहळी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची जनजागृती सुरू केली असल्याचे महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी सांगितले.
या जनजागृतीमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये कंपल्सरी मास्कचा वापर त्याचबरोबर सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर योग्य,सात्विक आहार आणि निसर्गोपचार पद्धतीचा वापर करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सहदेव माळी यांनी प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतः काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.या जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन भोसले,शाखाप्रमुख महाराष्ट्र कामगार सेना अचकनह्हळी मधुकर भोसले, उपाशाखा प्रमुख अचकनह्हळ जालिंदर शिंदे, सचिव राजश्री जाधव अचकनह्हळी यांनी केले.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर