
मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी:
औसा येथे “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या औसा मतदारसंघातील अंमलबजावणीचा शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औसा तहसिल कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित राहून आ.अभिमन्यु पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्या व सुपरवायझर यांचा गौरव ही करण्यात आला.याबरोबर औसा येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन वाफेच्या कीट्स वितरीत करण्यात आले.नागरसोगा येथे वृक्षारोपण करण्यात आले.औसा येथील केदारनाथ पेट्रोलियम येथे मास्क व सॅनिटायझर,कीट्स वितरीत केले.मतदारसंघातील आशा कार्यकर्त्यांशी आॅनलाईन संवाद साधत या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी स्वतः काही गावांना भेटी देऊन मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.तसेच संपूर्ण तालूक्यात प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी राबविणार असून बाधित रूग्ण आढळल्यास त्याच्यावर प्रा.आ.केंद्राअंतर्गत उपचार करण्यात येतील आणि संशयित रूग्णांची तपासणी करून घरीच आयसोलेशन करण्यात येईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांनी सांगितले.यावेळी औसा तहसीलदार सौ.शोभाताई पुजारी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख, पोलिस निरीक्षक ठाकूर तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर