
संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी:
माळशिरस तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाचा गारवाड येथे शुभारंभ सभापती शोभाताई साठे व.डाँ. वसंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत प्रत्येक घरापर्यंत पोहचून त्या घरामधील सदस्यना आरोग्य विषयक माहिती देणे व व्यक्तींच्या तपासणी करणे त्यामध्ये शरीरातील आँक्सिजनचे प्रमाण , ताप ,सर्दी खोकला श्वसनाचा त्रास. व इतर आजार आहेत का.व काही लक्षणे असेल तर तपासणीसाठी पाठवणे. आरोग्य शिक्षण देणे. तीन स्वयंसेवकची टिम आहे. यामध्ये आशा स्वयंमसेविका, शिक्षक ,अंगणवाडी सेविका, त्यासाठी त्यांना मास्क. सँनिटाझर.किट ग्लोज.इ.साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य सहाय्यक अशोक धाईंजे, आरोग्य सेवक रमेश बंडगर, सेविका मुलाणी व ग्रामसेवक विजय देशमुख, पोलीस पाटील धनाजी मगर व ग्रा.प.सदस्य व.कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर