
संजय हुलगे,माळशिरस/ प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंतच्या सेवा सप्ताह निमित्त श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस याठिकाणी सामाजिक नियमांचे पालन करीत आ.राम सातपुते,धैर्यशिल मोहिते पाटील,डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी १६३ लोकांची नेत्र तपासणी तर ७० जणांना चष्मे वाटप, ९३ कोरोना योध्दांचा सन्मान, ७० वृक्ष लागवड, मास्कचे वाटप व गरीब वस्ती व रुग्णालयामध्ये फळांचे वाटप करण्यात आले.तसेच माळशिरस शहराचे पहिले कर्तव्यदक्ष मा.उपनगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व राज्यस्तरीय आदर्श नेता राजरत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अशोक वाघमोडे, डॉ.राहुल गावडे, ॲड.सत्यजित गलांडे, बाळासाहेब वावरे, बाळासाहेब सरगर, महादेव माने, गौरव गांधी, विजय देशमुख, निलेश घाडगे, रावसाहेब देशमुख, धनाजी देवकर, प्राचार्य योगेश गुजरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन