कोरोनाग्रस्ताच्या मदतीला धावून आले कोरोना योद्धे!

पोलादपूर/ प्रतिनिधी:
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द गावात कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून येत आहे.रुग्णांची संख्या घटत आहे.कोरोनाच्या भयावह परिस्थितीत तुर्भे गावातील व्यक्तींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णाला दवाखान्यात नेले.त्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावरही बाजूला न हटता अंत्यसंस्कारापर्यंत सगळे विधी केले.कोरोना योद्धे यशवंत पदू उत्तेकर, गोविंद दगडू उत्तेकर, मंगेश जिवाजी उत्तेकर, संजय बाळकृष्ण उत्तेकर, पोलीस पाटील या कोरोना योद्धांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांना घरापासून हॉस्पिटल ते अंत्यसंस्कारापर्यंत सेवा दिली. तसेच या कोरोना योद्धांना दोन महिलांनी मोलाची साथ दिली.सौ. शर्मिला प्रकाश उत्तेकर, सौ. रेशमी राजेश सकपाळ अंगणवाडी सेविका मॅडम या दोन महिला पण कोरोना योध्याच्या मदतीला धावून आल्या. , तसेच या कोरोना योद्धांची तुर्भे पोलादपूर रायगड जिल्ह्यातुन प्रसिद्धी होत आहे. पोलादपूर तालुक्यातुन या कोरोना योद्धाची दखल घेत आई फाउंडेशनचे डॉ. विनोदरावजी मोरे व न्यू इंग्लिश स्कूल पैठणचे मुख्याध्यापक मंगेश उत्तेकर यानी कौतुक केले. या कोरोना योद्धांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.