ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्षपदी राजेंद्र घोरपडे यांची निवड

गुरुनाथ तिरपणकर/ बदलापूर,प्रतिनिधी:
बदलापुर शहरातील एक प्रसन्न व्यक्तीमत्व कुळगांव-बदलापुर नगरपरिषदेचे अभ्यासु नगरसेवक भाजप गटनेते व प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांची नुकतीच ठाणे जिल्हा ग्रामिण उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बदलापुर शहरातील विकास कामात त्यांचा मोठा सहभाग आहे. पक्षाच्या माध्यमातून व स्वतःच्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक,कला,क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवित असतात.भुमिपुत्र म्हणुन ग्रामिण भागातही ग्रामस्थांशी त्यांचे सौदर्यपुर्ण स्नेहाचे संबंध आहेत.विविध नाजरी आंदोलनामध्ये राजेंद्र घोरपडे हे अग्रस्थानी असतात व यशस्वी करतात. जनतेचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा हातखंडा आहे. अशा या कार्यसम्राट नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांची ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.