औशात नगरपालिकेची विनामास्क फिरणा-या व सोशल डिस्टंस न पाळणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही

मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी:

औसा शहरात व ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक व वाहनांची तोबा गर्दी होत आहे.अशा स्थितित नागरिक विनामास्क तर अनेकजण परवानगीपेक्षा जास्त लोक प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहेत.औसा नगरपालिकाचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख,मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जनजागृती करण्यात आली आहे.दि.१६ संप्टेंबर बुधवारपासून नगरपालिकेच्या वतीने विनामास्क फिरणा-या व्यक्ती व सोशल डिस्टंस न पाळणारे व्यापारी,ग्राहक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी जाहीर केले.यावेळी नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष जावेद शेख,मुजाहेद शेख,मेहराज शेख, गोवींद जाधव,आदि नगरपालिकाचे कर्मचारी उपस्थित होते.