
जत/प्रतिनिधी:
जत शहरात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव व डासांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नगरपरिषदेच्या वतीने शहर निर्जंतुकीकरण व डासांची फवारणी करावी अशी मागणी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी केली आहे.
जत तालुक्यात व शहरातील कोरोनाची वाढती परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने गांभीर्यपूर्वक रुग्ण कसे आटोक्यात आणता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच नगरपरिषदेने संपूर्ण शहरातून कोरोना निर्जंतुकीकरण फवारणी व डासांची फवारणी करून शहरवाशीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मोरे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर