
देवानंद जावीर, पुणे/ प्रतिनिधी:
शिरूरचे आमदार पवार आणि जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत तपासणी सुरू
कोरोना विरोधातील लढाईत ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हातील सर्व नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या प्रसंगी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील मोठ्या प्रमाणावर असलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या बरोबरच लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. कोरोनाला पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक गल्लीबोळातून कायमस्वरुपी दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच,लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था आणि नागरीकांनी स्वंयमस्फुर्तीने सदैव पुढाकार घेऊन कोरोना विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या शासकीय योजनेअंतर्गत पुणे जिल्हातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील नागरीकांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या शासकीय योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे दिनांक १५ सप्टेंबर २०२० मंगळवार रोजी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.राजेश देशमुख, आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी संदीप कोईनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, अशोक नांदापुरकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात,लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ,उपसरपंच नाना कुंजीर,ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर