अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
जत तालुक्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून ही साखळी तोडण्यासाठी जनतेने गांभीर्यपूर्वक कडक जनता कर्फ्यूचे पालन करणे गरजेचे आहे. जत तालुक्याचा मृत्यू दर हा 0.27 टक्के एवढा गंभीर असून रूग्णांची व्यवस्था करताना आरोग्य यंत्रणेचा ताण लक्षात घेऊन जनतेने स्वयंम् शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. तेव्हा जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन युवक नेते मेहबूब शेख यांनी केले.
जत तालुक्यातील कोरोना रूग्णसंख्या ही 743 च्या घरात गेली आहे. दिवसाला 30 ते 40 रुग्णांची संख्या वाढत आहे.आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा लक्षात घेऊन सोशल डिस्टिन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.जनता कर्फ्यु हा प्रशासनासाठी नसून तो जनतेमधील समूह संसर्ग कमी करण्यासाठी आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. १० दिवसात कोरोनाची साखळी काही प्रमाणात तुटल्यास रूग्णसंख्या कमी होऊन आरोग्य व्यवस्था सर्वांनाच उपलब्ध होईल.
शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’असे अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत स्वत:च्या कुटुंबाची जबाबादारी प्रत्येकाने घेऊन जनता कर्फ्यु पाळून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मदत करावी,वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन जनेतेने सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा,असे आवाहनही शेख यांनी केले.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर