इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात ऑनलाइन शिक्षक दिन अभियान संपन्न

 मोहनराव पुजारी 
आटपाडी /प्रतिनिधी:

दिघंची (एकतानगर) येथील इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात संस्थेचे संस्थापक ईश्वरतात्या मोरे-पाटील व प्राचार्य सौ.स्वाती मोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन अभियान अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून सोडले असल्याने ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ मोहिमेअंतर्गत संकुलात ऑनलाइन शिक्षण सुरू करून तळागाळातील मुलापर्यंत पोहोचवण्याचे काम इंद्रभाग्य संकुलाने केले आहे व सध्याही सुरु आहे. ऑनलाइन शिक्षण कंटाळवाणे होऊ नये म्हणून विविध उपक्रम सुरू आहेत. व्हर्च्युअल स्कूल सुरू करताना अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात हे सिद्ध करून दाखवताना जिल्ह्यात संकुलाने आदर्शवत कार्य सुरू केले.प्रथम ऑनलाइन बैठक व नियोजन, सर्व वर्गाचे गट तयार करुन जुलैपासून पहिली ते बारावीपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. यामध्ये प्राचार्या स्वातीताई मोरे-पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
सकाळी सात ते दहा व रात्री सात ते नऊ अशी सत्रे घेऊन सर्व विषयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले आहे .यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे हे पाहून विविध उपक्रम सुरू केले. त्यामध्ये माझे प्रेरक शिक्षक या अंतर्गत शिक्षक दिन अभियान संपन्न झाले.
5 सप्टेंबर या दिवशी ऑनलाइन वकृत्व स्पर्धा आयोजित करून ऑनलाइन स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक ईश्वरतात्या मोरे-पाटील व प्राचार्य सौ.स्वाती मोरे-पाटील यांनी डॉ.राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिक्षक विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केल.या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक रांगोळी, घोषवाक्य, निबंध,पोस्टर्स,चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये
विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी:
वक्तृत्वस्पर्धा:
गौरी दशरथ अनुसे-प्रथम 
सुशांत संजय पारसे-द्वितीय 
मोहीज हरून तांबोळी-तृतीय
निबंध स्पर्धा :
स्नेहल दिनकर सूर्यवंशी-प्रथम 
विवेक सागर सातपुते-द्वितीय 
आसावरी नितीन जाधव-तृतीय
रांगोळी स्पर्धा: 
सायली कृष्णदेव मोरे-प्रथम 
प्रणाली नवनाथ मोरे-द्वितीय 
नम्रता पांडुरंग पाटील-तृतीय
पोस्टर/ चित्रकला स्पर्धा:
सुप्रिया संजय जरे-प्रथम 
दीप्ती विनायक शेंडे-द्वितीय 
हर्षदा किरण मिसाळ-तृतीय
घोषवाक्य स्पर्धा:
आरती दिगंबर माने-प्रथम 
तनुजा विजय कोळेकर-द्वितीय 
सत्यम सोमनाथ गाढवे-तृतीय

 प्रास्ताविक डी.के.यादव यांनी केले.एस.जी.पाडवी यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले.ए.बी.जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आर.के.कुंभार यांनी आभार मानले.