मोहनराव पुजारी
आटपाडी/ प्रतिनिधी:
शिक्षक नेते व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी येथील आय.टी.आय कॉलेजवरील कोवीड केअर सेंटरमधील 135 रुग्णांना तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयातील 25 रुग्णांना मोफत शिजवलेली 500 अंडी देऊन अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रमाने आटपाडी शिक्षक समितीच्या वतीने संपन्न करण्यात आला.
यावेळी डॉ. सुयश नवले, डॉ .सुप्रिया ऐवळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले .हा उपक्रम यु.टी.जाधव यांचे उपस्थितीत तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड,ज्येष्ठ नेते रमेश हेगडे ,आदर्श शिक्षक हैबतराव पावणे,आदर्श शिक्षक अजय राक्षे,डॉ.आंबेडकर,शाहू,फुले सहकारी रुग्णालयाचे संचालक श्रीकांतराजे कुंभार, शिक्षक नेते संजय कबीर,विभाग सचिव दीपक कुंभार ,मार्गदर्शक बाळासाहेब ठोंबरे,यशवंतराव मोरे,कट्टर समिती सैनिक भास्करराव डिगोळे,सल्लागार पांडुरंग ऐवळे, चंद्रकांत विभुते,सर्जेराव पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर