अनिल मदने/जत,प्रतिनिधी:
जत तालुक्यात आज १५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास आधिकारी अरविंद धरणगुत्तीवार यांनी दिली.
कोवीड-१९ विषाणुचा प्रादृर्भाव रोखण्यासाठी सर्वतापरी प्रयत्न होत आहेत. मास्कचा उपयोग, सुरक्षीत अंतर, निरजंतूकी करणाचा वापर याच्या पलीकडे जावुन आता सार्वजनिक आयुष्यात नविन बदलांचा अवलंब करणें आवश्यक झाले आहे.कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविणेसाटी जत पंचायत समिती क्षेत्रात माझे कुटूंब माझी जवाबदारी हि मोहीम आजपासून राबविण्यात येणार आहे.
या माहिम अंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले कर्मचारी व स्वयंसेवक ग्रामपंचायत क्षेत्रांतील प्रत्येक घरोघरी जावून लोकांची ताप आणि प्राणवायू पातळी तपासणार आहेत. त्याचबरोबर नागरीकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे अरोग्य संदेश देणे कोविड-१९ चे संशयित रूग्ण शेधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे यासारख्या बाबी राबवल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदयवकार, मूर्यापिंड (किडणी ) विकार लट्टपणा यासारखे आजार असणा-या व्यक्तिना शोधुन काढणे व उपचारासाठी संदर्भसेवा या बाबीचा ही या मोहिमेत समावेश असणार आहे. माहिमच्या एकूण कोलावधी
दरम्यान साधारणपणे २ वेळा स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबांनाना भेटार आहेत. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्ये पाळताना आनावधानाने चुक होत असलेस
एकमेकांच्या निदर्शनास आनुन द्यावीत. हा यातील महत्वाचा भाग आहे. या अनुशंगाने आपल्या तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीच्या पथक तयार केले असून१५ सप्टेंबरपासून आपल्या तालुक्यामध्ये सदर मोहिमचा शुभारंभ होणार असुन मोहिमेची पहिली फेरी दिनांक १५सप्टेंबर ते १०/१०/२०२० या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दिनांक
१४/१०/२०२० ते दिनांक २४/१०/२०२० या कालावधीमध्ये होईल. पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवसाचा असेल तर दूस-या फेरीचा कालावधी १० दिवसाचा असेल.
माझे कूटुंब माझी जवाबदारी म्हणून तालुक्यातील सर्व प्रामपंचायत, गाव, वाडी, तांडे, पाडे, इत्यादीमध्ये राहणा-या
प्रत्येक नागरीकाची तपासणी केली जाईल.
तरी सदर मोहिमेचा शुभारंभ तालुक्यामधील सर्व गावांमध्ये होणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी दिली.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर