सुभाष मोरे
बुलडाणा/प्रतिनिधी:

संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले असून त्यासाठी बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेले असता ११ सप्टेंबर रोजी सर्व खासदारांसोबत त्यांचीसुध्दा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह निघाले असले तरी आपणास सर्दी, खोकला, ताप व श्वसनाचा कुठलाच त्रास नसुन कोरोनाची कुठलीच लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी पण ते दिल्ली येथील निवासस्थानीच क्वारंटाईन असून डॉक्टरची एक टिम त्यांच्या तब्बेतीवर लक्ष ठेऊन आहे.अधिवेशन संपल्यानंतर लवकरच आपल्या भेटीसाठी येणार असून आपण सुध्दा स्व:ची,आपल्या कुटुंबांची,काळजी घेऊन कोरोनावर मात करण्याचे आवाहन त्यांनी बुलडाणावासियांना केले आहे. कार्यकर्ते व शुभचिंतकांचे तब्बेतीविषयी चौकशीचे येणारे फोन लक्षात घेता त्यांनी तब्बेतीबाबतचा खुलासा असलेला व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर