आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीने केला ‘आदर्श’पावणे गुरुजींचा सन्मान!


आटपाडी/प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळवेवाडीचे उपक्रमशील शिक्षक, हैबतराव पावणे गुरुजींना यावर्षीचा सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पंचायत समितीचे उपसभापती रुपेशकुमार पाटील,किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह.बँक मा.चेअरमन तथा विद्यमान संचालक यु. टी. जाधव, तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड, महिला आघाडी अध्यक्षा सौ. वैशालीताई राक्षे ,सरचिटणीस तेजस्विनी गायकवाड ,डॉ. आंबेडकर, शाहू, फुले सह. रुग्णालय संचालक श्रीकांतराजे कुंभार, आदर्श शिक्षक अजय राक्षे ,शिक्षक नेते संजय कबीर, विभाग सचिव दीपक कुंभार, कट्टर समिती सैनिक भास्कर डिगोळे, यशवंतराव मोरे ,आमचे सन्मित्र अनिल भाऊ गायकवाड, सोमनाथ राक्षे ,दत्तामामा गाडेकर, अरुण गाडेकर , श्रीमती सुमन राक्षे, सौ.अनिता जाधव ,अर्चना कबीर, स्वाती कुंभार, मीनाक्षी बाड ,रेखा गाडेकर,भारती गाडेकर, आदींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला. पावणे गरूजींना भावी कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या.