
दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन २०२०-२१ सालचा हा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा गळवेवाडी येथील हैबतराव जयवंत पावणे यांना जाहीर झाला आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा…
* सन 2002 मध्ये ‘ग्रामस्वच्छता अभियान’ कार्यक्रमात ‘स्वच्छता दूत’ म्हणून कार्य केले.
* सन 2011 -12 मध्ये आधार ग्रामीण विकास संस्था कुंडल यांच्या सहकार्याने शाळास्तरावर रंगभरण स्पर्धा आयोजित केली.
* जिल्हा परिषद शाळा नं. 2 बनपुरी चा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 75% लावला.
* पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आणलेली मुले-मुली: स्वप्नील नानासाहेब गिरी गुणवत्ता यादीत तिसरा, संकेत हैबतराव ठेंगले गुणवत्ता यादीत चौथा, कु. उत्कर्षा प्रफुल्लकुमार कांबळे गुणवत्ता यादीत चौथी, कु. पूनम भगवान यमगर गुणवत्ता यादीत पंधरावी.
*माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी: कु. बिंदू भारत यमगर गुणवत्ता यादीत दुसरी, कु.करिश्मा मुसा मुलाणी गुणवत्ता यादीत तेविसावी, जिल्हा परिषद शाळा नंबर 2 बनपुरी मध्ये आले.भूमिहीन शेतकऱ्यांचा मुलगा सोनू संजय वाघमारे गुणवत्ता यादीत आला.जिल्हा परिषद शाळा आवळाई चा वैभव सर्जेराव पिसे व कु. संध्या उत्तम घाडगे गुणवत्ता यादीत अनुक्रमे एकोणिसावा व प्रथम आली.
* महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत रोहित भारत यमगर गुणवत्ता यादीत तिसरा आला.
* सैनिक स्कुल परीक्षेत अजय बापूसाहेब सोन्नूर जिल्हा परिषद शाळा नंबर 1 बनपुरी व रामकृष्ण यशवंत गोडसे जिल्हा परिषद शाळा गळवेवाडी निवड होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन केले.
* जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरावर बौद्धिक स्पर्धेत इंग्रजी भाषासमृद्धी मध्ये जिल्हा परिषद शाळा आवळाई च्या कु. वैष्णवी सदाशिव पिंजारी व कु.संचिता बापूराव साळुंखे इयत्ता चौथी यांनी जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. कु. वेदिका अमोल साळुंखे व कु.मयुरी लक्ष्मण साळुंखे इयत्ता सातवी तालुका प्रथम व जिल्हा द्वितीय क्रमांक प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले.
* क्रीडा स्पर्धेतील यश: कु.अक्षदा साळुंके हिने 200 मीटर धावणे स्पर्धेत तालुका प्रथम व जिल्हा उत्तेजनार्थ क्रमांक जिल्हा परिषद शाळा आवळाईला मिळवून दिला. जिल्हा परिषद शाळा गळवेवाडी कबड्डी मुलींचा मोठा गट तालुका प्रथम व जिल्हा सहभाग घेतला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात धनश्री ज्ञानेश्वर खिलारी इयत्ता सातवी हीने गोळाफेक स्पर्धेत तालुका स्तरावर दुसरा व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला.
* सन 2020 लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा गळवेवाडी च्या मोठ्या गटाने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
* प्रकल्प तालुका आटपाडी अंतर्गत हस्तलिखित व उपक्रमशील शाळा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने भव्य ढाली मिळवण्यात यश.
* स्काऊट गाईड चळवळीत 2002 पासून स्काऊट व कब प्रशिक्षण घेतलेले आहे.दरवर्षी पथक नोंदणी व कार्यवाही केली जाते.चतुर्थ चरण परीक्षेला कबना बसवून आतापर्यंत 16 कबना सुवर्णबाण या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात भाग घेतला.जिल्हास्तरीय मेळाव्यातील उत्कृष्ट स्काऊट पथकाचा बहुमान शाळेला मिळवून दिला. सन 2019-20 मध्ये नऊ स्काऊट राज्य पुरस्कार परीक्षेत उत्तीर्ण झाले.सन 2014-15 पासून तालुका स्काऊट गाईडचा सचिव म्हणून काम करीत आहे.
* दरवर्षी फोंड्या माळावर बिया रोपनातून वृक्षारोपण करण्यात येते.
* 2017 च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा वेळू येथे प्रशिक्षण घेऊन बनपुरी गावाला पाणीदार बनवले.
* पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून कर्तव्य केले.
* दरवर्षी 13 ऑगस्टला शहीद जवान विष्णू पुकळे यांच्या स्मृतिदिनी सलग अठरा वर्षे रक्तदान शिबीर आयोजक व रक्तदाता म्हणून राष्ट्रीय कार्य पार पाडतो आहे.
* जिल्हा परिषद कर्मचारी व पदाधिकारी स्पर्धेतील पाच किलोमीटर चालणे या प्रकारात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक- योग टीचर पदविका प्राप्त करून श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय योगासने स्पर्धा व परिषदेत सहभाग घेऊन चौथा क्रमांक प्राप्त केला.
* जिल्हा परिषदेच्या हिवाळी संस्कार शिबिरात मुलांना स्काऊट व विपश्यनेचे धडे दिले.
* ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात मुलांना योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाचे मार्गदर्शन करीत आहे.
* आर.आर.आबा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
* सन 2019-20 मे महिन्यात कोरोना योद्धा म्हणून उंबरगाव चेक पोस्ट सांगली-सोलापूर जिल्हा हद्दीवर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
*आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या आदेशाने सूतगिरणी कामगार,तालमीतील पैलवान, वस्तीगृहातील मुलांना योगाचे धडे दिले.श्री सायकल क्लब व वॉक थाॅन मध्ये सक्रिय सहभाग.
* विजयनृत्य नाट्यमंडळ बनपुरी या नाट्य संख्येत डाकु मानसिंग,सोन्याची लंका या नाटकांत भूमिका केलेली आहे.
वरील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.त्याबद्दल पंचायत समिती आटपाडीच्या सभापती भूमिका बेरगळ, उपसभापती रुपेशकुमार पाटील, गटविकास अधिकारी पंकज शेळके, गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे,मुख्याध्यापिका सौ.रंजना सूर्यवंशी,सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, यशवंत गोडसे,सत्यवान मोटे,जगदीश खाडे, मुकेश क्षिरसागर,अक्षय थोरात, गोरख मैड यांनी त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश