‘श्री शंकर’ची थकीत एफआरपी द्या,अन्यथा चेअरमनच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार: रविकांत तुपकर

संजय हुलगे 
माळशिरस/ प्रतिनिधी:

माळशिरस तहसिलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने श्री.शंकर सहकारी साखर कारखान्याच्या थकीत एफ.आर.पी.असलेली सुमारे ३० कोटी,तसेच कामगारांचा थकित पगार,सेवानिवृत्त झालेले कामगारांचा फंड व शंकर सहकारी कारखान्याची पालखी महामार्गासाठी भू-संपादित झाली आहे,या संपादनातून मिळणारी सुमारे ५ ते ६ कोटी रक्कम थेट शेतकऱ्यांना  बिलापोटी देण्यात यावी,या मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन पार पाडले.
     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर , पंचायत समिती सदस्य अजय सकट, शंकर सहकारी कारखान्याचे माजी संचालक विलास आदरट,मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,तालुकाध्यक्ष  सुरेश टेळे, रोहित पवार विचार मंचाचे मच्छिंद्र गोरड,बाबासाहेब काळे,प्रशांत रुपनवर,रासपचे अँड. सिताराम झंजे,युवा नेते शिवराज पुकळे,संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्रीनिवास कदम- पाटील,मगन काळे,कमलाकर माने देशमुख,अमरसिंह माने देशमुख, मदनसिंह जाधव, अजित कोडक, विनोद गाढवे यासह ऊस उत्पादक शेतकरी,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी प्रशासनातर्फे निवेदन निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी स्वीकारले. या एक दिवसीय धरणे आंदोलनात कोरोना विषाणूच्या प्रतिबंध रोखण्यासाठी सोशल डिसटन्स , मास्क, व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता. या आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच  चोख बंदोबस्त ठेवला होता.