कोणत्याही कामात गती, प्रगती ,सामाजिक बांधिलकी, म्हणजेच प्राथमिक शिक्षक समिती
सांगली /प्रतिनिधी:
- सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पुढाकाराने अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर,शाहू,फुले सहकारी रुग्णालय मर्यादित सांगलीचा शुभारंभ होत आहे .कोवीडसारख्या जागतिक महामारीच्या काळातही प्राथमिक शिक्षक समितीने आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा वारंवार प्रयत्न ठेवला आहे .त्याचाच भाग म्हणून शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर पासून गुलिस्ता इमारत,पटवर्धन हॉलजवळ ,विजय कॉलनी, मिरज येथे हे भव्यदिव्य कोविंड सेंटर सुरू करण्यात येत आहे.याचा लाभ प्राथमिक शिक्षक, त्यांचे नातेवाईक , तसेच दुर्दैवाने कोवीड सारख्या आजारास बळी पडलेल्यांनाही होणार आहेच. शिवाय समाजातील विविध स्तरातील रुग्णांनासुद्धा शिक्षक समितीने हे मानवतेच्या सेवेचे दालन खुले केले आहे. प्राथमिक शिक्षक समितीचे मार्गदर्शक , प्रचंड ऊर्जादायी राज्यनेते, विश्वनाथ (अण्णा) मिरजकर ,राज्याचे मा. कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड,पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसनआप्पा पाटील, महासचिव शशिकांत भागवत, राज्य संघटक सयाजीराव पाटील,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड,सहकारी रुग्णालयाचे चेअरमन राजेंद्र कांबळे, व्हा. चेअरमन अजितकुमार पाटील तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन सुनिल गुरव, व्हा. चेअरमन महादेव माळी व सहकारी रुग्णालयाचे संचालक मंडळ आणि शिक्षक बँकेचे सन्माननीय सत्ताधारी संचालक मंडळ, जिल्हा व तालुका कार्यकारिणी , महिला कार्यकारिणी , सर्व सन्माननीय सदस्य यांच्या पुढाकारातून व अथक परिश्रमातून हा समाजसेवेचा नवा दिपस्तंभ अखंड महाराष्ट्राला आदर्श ठरेल. व आपणही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे व्रत अविरतपणे सुरू ठेवण्याचे शिवधनुष्य महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पुढाकाराने पेलले जाणार आहे .यात अनेक ज्ञात-अज्ञात ,हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने हा समाजसेवेचा रथ निश्चितच आदर्शवत ,दिशादर्शक व दिलासादायक , आशादायक,ठरेल .यात तिळमात्र शंका नाही. “आपली सांगली, लय लय चांगली ” या ब्रीद वाक्यास सार्थ ठरेल .अशी कामगिरी सर्वांकडून होईल अशी आशा बाळगुया व थोर समाजसुधारकांच्या नावे सुरू होणारे रुग्णालय निश्चीतचसमाजमनाच्या ह्रदयसिंहासनावर आरूढ झाल्याखेरीज राहणार नाही.रुग्णालय सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार सां.जि.प्राथ. शिक्षक सह. मा. चेअरमन तथा विद्यमान संचालक यु .टी. जाधव मानले आहेत.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे