गुरुनाथ तिरपणकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/बदलापुर:
बदलापुर शहरातील नागरीकांच्या मुलभुत व इतर नागरी समस्यांकडे लक्ष देण्यासाठी कार्यरत आहे.नगरपालिकेच्या माध्यमातून शहर प्रवासी संघटनेने त्या सोडविलेल्या आहेत.अशा वेळी गृहनिर्माण सहकारी को.ऑप्रेटीव्ह सोसायटींच्या काही तक्रारी शहर प्रवासी संघटनेकडे येऊ लागल्या.गृहनिर्माण सहकार्य संस्थांनमध्ये बिल्डरने करु न दिलेल्या सोसायट्या, इमारतीत रहात असणा-या भाडेकरुंचा हैदोस,सोसायटीतील हेवेदावे,काही वेळा घर मालकांचा उध्दटपणा अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या.हे सर्व प्रश्न व समस्या सर्वांच्या सहकार्याने व सामोपचाराने सुटाव्यात याकरिता सुधाकर पतंगराव यांच्या नेतृत्वाखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या माध्यमातून कायदेशीर न्याय,सबलिकरण करुन समस्या सोडविणे,राज्यस्तरावरिल सरकारी निष्णात गृहनिर्माण संस्थांच्या सहकार्यांच मदत,सहकार्य व मार्गदर्शन घेणे,सुंदर बदलापुर शहर शांतता प्रिय कस होईल,याकडे लक्ष देणे, सहकाराची व्याख्याच मुळी शांततामय सहजीवन जगण्याची आहे.काही वाईट प्रवृत्ती बळावलेल्या आहेत, याकरिता सर्व शासकीय यंत्रणांची मदत घेऊन गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांवर अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळवून देण्यात येईल.एकीच बळ यशप्राप्तीकडे नेत असत.अशा सहकारी गृहनिर्माण सहकारी विविध समस्या सोडविण्यासाठी बदलापुर शहरातील सोसायट्यांनी महासंघामध्ये सामिल व्हावे.अधिक माहितीसाठी निमंत्रक बाळासाहेब सावंत 8928352532 व सुधाकर पतंगराव 9324060708 यांच्याशी या नंबरवर संपर्क साधावा.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे