
सुभाष मोरे /बुलडाणा,प्रतिनिधी:
बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले डॉ. धनंजय सातपुते यांनी डी.एन.बी.(अर्थो) या वैद्यकिय परिक्षेत देशामधून प्रथम येण्याचा बहुमान मिळवून बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
लोणार तालुक्यातील मातरखेड या अगदी छोट्याशा गावात जन्मलेले डॉ. धनंजय सातपुते हे माजी सैनिक दामोदर सातपुते व अंगणवाडी सेविका मथुराबाई सातपुते यांचे सुपुत्र असुन घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे डॉ.धनंजय सातपुते यांनी प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच घेतले. लालबहादूर शास्त्री विद्यालय वेणी येथे ते १० वी उतीर्ण झाले.अकोला येथे वैद्यकिय पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी त्यांनी केरळच्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला.२०१९ मध्ये झालेल्या डी. एन. बी (अर्थो) या वैद्यकिय पदवी परीक्षेत देशामधून प्रथम येण्याचा बहुमान मिळवून जिल्ह्याचे नाव देशभरात चमकवले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीसुध्दा कमी नसल्याचे आपल्या यशामधुन दाखवून दिले.
जिद्द व चिकाटी अंगी असल्यास यशाचे शिखर सर करण्यास परिस्थिती अडसर ठरु शकत नाही.हेच त्यांनी आपल्या यशामधून दाखवून दिले.ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉ.धनंजय सातपुते यांचा आदर्श घेऊन तरुण आपले भविष्य उज्ज्वल करतील यामध्ये शंका नाही.डॉ. धनंजय सातपुते यांच्या यशाबद्दल जिल्हयात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश