तन्वी पुकळे शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम

मोहनराव पुजारी
आटपाडी /प्रतिनिधी:

भारती विद्यापीठामार्फत डिसेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धा परीक्षेत विटा येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी व बनपुरी गावची कन्या कु.तन्वी दादासाहेब पुकळे हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
भारती विद्यापीठातर्फे डिसेंबर 2019 मध्ये शालेय स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा परीक्षेत खानापूर तालुक्यातील विटा येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी बनपुरी (ता.आटपाडी) गावची कन्या कु. तन्वी दादासाहेब पुकळे हिने दहावीच्या वर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दुष्काळी भागाच्या विद्वत्तेचे नावलौकिक मिळवले आहे.भारती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य ,मार्गदर्शक शिक्षक,पालक यांचेही अभिनंदन केले आहे.तसेच तिला 2500 रुपयांचे पारितोषिक दिले आहे.
कोरोना महामारीच्या काळात दरवर्षी 10 मे 2020 रोजी होणारा सत्कार समारंभ सोहळा होऊ शकला नाही.शाळेमार्फत तिला बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे.