संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी:

प्रा.आ.केंद्र मांणकी अंर्तगत गारवाड येथे जिल्हा परिषद शाळेतील सर्व परिसर वर्ग औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.प्रा.आरोग्य केंद्र मांणकी यांच्यावतीने गारवाड येथे आसपासच्या परिसरातील कोरोना संर्पकातील व्यक्तींच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभागाच्या वतीने कोविड १९ रॅपीड टेस्ट, व आर टी पि सी आर टेस्टचा कॅम्प घेण्यात आला.
यावेळी गारवाड येथे रॅपीड ७२ , R T P C R २० , स्वॅब घेण्यात आले त्यापैकी १४ रॅपीड टेस्ट positive आल्या. यामध्ये गारवाड ८ , इस्लामपूर ३ , माणकी १ , गोरडवाडी १ , माळशिरस १ ,या गावानी सहभाग नोंदवला.रॅपीड ७२ तर आर टी पि सी आर २० अशा एकुण ९२ व्यक्तींच्या टेस्ट घेण्यात आल्या.
सदर कॉम्प हा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन शेंडगे,डॉ.वसंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी सदर कॅम्पमध्ये अंकुश पवार,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रा.आ.केंद्र बोरगाव यांनी स्वॅब घेतले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी सुनिल कावळे आरोग्य सहाय्यक, प्रा.आ.केंद्र माणकी यांनी नियोजन केले, रमेश बंडगर आरोग्य सेवक गारवाड, बाळासाहेब ढावरे आरोग्य सेवक कन्हेर, अरविंद भोपळे आरोग्य सेवक रेडे, अक्षय जाधव आरोग्य सेवक तरंगफळ, विजय कांबळे आरोग्य सेवक मोटेवाडी ( मा)यांनी परीश्रम घेतले.SRF नंबर माळी जे.डी.आरोग्य सेविका रेडे यांनी काढले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी मुलाणी सिस्टर आरोग्य सेविका गारवाड यांनीही विशेष परिश्रम घेतले.
यावेळी गारवाड गावचे ग्रामसेवक देशमुख, पोलिस पाटील धनाजी मगर, चेअरमन नानासाहेब मगर,सुभाष साठे,योगेश लोंढे याच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर