डॉ.निलेश सगरे यांचा सत्कार

घाटनांद्रे/प्रतिनिधी:
कुची ता.(कवठेमहांकाळ) येथील डॉ.निलेश सगरे यांनी कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून गावातील तसेच परिसरातील लोकांची आरोग्य सेवा केली आहे.त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपले कर्तव्य बजावले असल्यामुळे गावातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.तसेच शिवनेरी ग्रुपकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक शिंदे, संतोष पाटील, सागर जाधव, महादेव गुरव,सुनिल पवार, संदीप पाटील, राहुल शिंदे, एकनाथ पाटील, अमोल पाटील, अविराज, सुयोग,क्षितिज,सहदेव आदी  उपस्थित होते.