
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांना जत शहरातील आशा वर्कर्स यांना कोरोनाच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता नगरपरिषदेकडून मिळावा या संदर्भात कॉ.हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
जगभर कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे.हे काम करणाऱ्या सर्वप्रथम आशा वर्कर्स आपल्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आशा वर्कर्स यांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाच्या कामासाठी विशेष १००० रु. प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे.कोरोना जोपर्यंत आहे,तोपर्यंत त्यांना तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. इतर ठिकाणी महापालिका, नगरपालिका या आपापल्या परीने आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेस फंडातून प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे.
जत नगरपरिषद अंतर्गत ३३आशा वर्कर्स काम करत आहेत.शासनाकडून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. जत नगरपरिषदने ही सेस फंडातून आशा वर्कर्स यांना एप्रिलपासून प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व जोपर्यंत कोरोना आहे,तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. यासंदर्भात वेळोवेळी जत नगरपरिषदेला भेटून निवेदन दिले आहेत त्यावेळी ते म्हणत असतात कि, आम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात पत्र नाही. आम्हाला जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र आल्या शिवाय आम्ही देऊ शकत नाही असे सांगतात.आशा वर्कर्स यांच्या प्रोत्साहन भत्ताविषयी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
यावेळी ललिता सांवत,राजश्री कोळी,लता मदने, अर्चना काळे, रुक्साना मुजावर, विद्या साळे इ.आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर