…अन्यथा सांगली जिल्ह्याची राखरांगोळी होईल:स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे

देवानंद जावीर
सांगली/ प्रतिनिधी:

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर सांगली जिल्हा परिषदेने मोफत रेमदिसिवर इंजेक्शन उपब्धत करून द्यावीत,तसेच राज्य शासन,जिल्हा प्रशासन व साखर कारखाने,आमदारांनी सुसज्ज हॉस्पिटल उभा करावीत अन्यथा सांगली जिल्ह्याची राखरांगोळी होईल,अशी भीती स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
    खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर जगात सर्वात जास्त आहे. भारताचा मृत्यू दर 1.81 टक्के ,महाराष्ट्राचा मृत्यू दर 3.21 टक्के तर जगाचा मृत्यू दर 3.43 टक्के आहे.याचाच अर्थ जगापेक्षा सांगलीचा मृत्यू दर सर्वात जास्त आहे.हा मृत्यू दर  जास्त असण्याची अनेक कारणे आहेत. चांगली औषधे नाहीत,रेमदीसिवर इंजेक्शन नाहीत,व्हेंटिलेटरयुक्त बेडची संख्या फारच कमी आहे.ऑक्सिजनसह बेडची संख्या फारच तोकडी आहे.तसेच रिपोर्ट वेळेत येत नाहीत.या सर्व कारणांमुळे जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे.
सांगली महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीही हालचाल करताना दिसत नाहीत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने रुग्णासाठी मोफत रेमदिसीवर औ्षधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.डॉक्टरची तयार केलेल्या तज्ञ समितीची शिफारस, उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटल डॉक्टरचे प्रिस्किप्शन आणि आधारकार्ड आदी पूर्तता केली की रेमदीसीवर इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनची किंमत पाच हजार रुपये इतकी आहे.रुग्णाच्या परिस्थितीनुसार तीन,पाच, सात दिवस ,दिवसाला दोन इंजेक्शन याप्रमाणे दिली जातात. म्हणजेच एका रुग्णाला सरासरी सहा ते दहा  इंजेक्शन दिली जातात. याची किंमत सरासरी 40 ते 50 हजार इतकी होते.ही सर्व इंजेक्शन कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून मोफत वाटप सुरू आहे.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सांगली जिल्हा परिषदेनेही सुविधा द्यावी.त्यामुळे अनेकाचे प्राण वाचतील.या इंजेक्शनमुळे लंग्ज इंजेक्शन कमी करण्यास मदत करते.त्यामुळे सदर इंजेक्शन ब्लॅकने जास्तीचा दर घेवून विकली जातात. या इंजेक्शनने रुग्ण बरा होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी जादा आहे. पण ही  सरकारी दवाखान्यात दिली जात नाहीत. त्यामुळे किमान गरीब रुग्णासाठी रिमदिसिवर इंजेक्शन जिल्हा परिषदेने उपब्धत करून मृत्य दर कमी करण्यासाठी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.