
सुभाष मोरे/लोणार,प्रतिनिधी:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वचजण प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये पत्रकारानेसुध्दा आपल्या क्षेत्रात कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी होऊन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी जिवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून महत्वाची भूमिका बजावली आहे.याची दखल लोणार तहसिलचे तहसिलदार सैपन नदाफ यांनी घेवून लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सिद्धेश्वर दहातोंडे यांना कोविड योद्धा म्हणून लोणार तहसिल कार्यालयाच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर