जत शहरातील मुस्लीम मदरसा येथे कोविड सेंटर करण्यास परवानगी द्या- सलीम गवंडी

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :

जत शहरात कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जत शहरातील मुस्लीम मदरसा येथे कोविड सेंटर करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समिती जिल्हा सदस्य सलीम गवंडी यांनी केली आहे.
जत शहरात गेल्या काही दिवसापासून कोविड रूग्णाची संख्या वाढत आहेे. अशा रूग्णांच्या प्रमाणात जत शहरातील सरकारी रूग्णालयामध्ये बेड कमी पडत आहेत. त्यामुळे रूग्णांना नाईलाजाने खाजगी रूग्णालयात नेले जात आहे. परंतू खाजगी रूग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. तसेच सरकारी रूग्णालयामध्ये सर्दी,खोकला झाला तरी त्यांना सांगली, मिरज येथे पाठवले जाते. अशा वेळी खाजगी वाहनवाले रूग्णांना नेण्यास नकार देतात.अशा वेळी रूग्णांना अॅब्युलन्समध्ये नेले जाते. अॅब्युलन्समधून घेऊन जाताना रूग्ण धसका घेतो.अशा वेळी हार्टअॅटकनेदेखील काही रूग्ण मरण पावले आहेत. त्यामुळे जत शहरातील मुस्लीम मदरसामध्ये अशा रूग्णांची सुविधा करण्यास आम्हास परवानगी मिळावी. या कोविड सेंटरसाठी आवश्यक असणारी व्हेंटीलेटर,ऑक्सिमीटर आदिची सोय आम्ही करण्यास तयार आहोत. १०० रूग्णाचे कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी असे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना पाठवले आहे.
महाराष्ट्र अल्पसंख्यांक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलीम गवंडी, मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष राज्य भाई नगराजी, मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष शफिक भाई इनामदार, दादा प्रतिष्ठानचे सलीम भाई पाचापुरे, हाजी इसाक नदाफ (आमिरसाब), हाजीअब्दुल गणी बागवान ,हारुण इनामदार, अब्दुल जब्बार मुल्ला ,रमजान डफेदार, आलम नदाफ, सिकंदर पखाली ,अखिल नगराजी ,अर्षद गवंडी ,काशीम गवंडी आदी सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते.