
मोहनराव पुजारी
आटपाडी/प्रतिनिधी:
आटपाडी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी आटपाडीचे तहसिलदार, खानापूर विभागाचे प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सध्या आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे.त्यामध्ये दिघंचीसारख्या शहरात रोज 25 पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.त्याचबरोबर सध्या दिघंची शहरात तापाची व विषाणूजन्य प्रादुर्भावाची साथ चालू असल्याने तातडीने प्रत्येक घरोघरी तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे,अन्यथा ही तापाची साथ वाढून अत्यंत बिकट परिस्थिती होण्याची शक्यता आहे.आटपाडी तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी केली आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर