
शिवसैनिकांकडे कुणी जर वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांची गय केली जाणार नाही: रावसाहेब घेवारे
अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :
जतमध्ये प्रथमच कामगार सेना संपर्क कार्यालयचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे व शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अजिंक्य पाटील यांच्या हस्ते साईनगर येथील परिवर्तन हाॅल येथे संपन्न झाला.
जतसारख्या दुष्काळी भागात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा परिस्थितीत येथे शिवप्रेमींनी कामगार सेना व शिवसेना वाढीस पुढाकार घेतला आहे हे वाखाणण्याजोगे आहे. त्यातून त्याच्या मनात एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. आपल्या मनोगतात रावसाहेब घेवरे यांनी सर्व शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचारपूर्तीसाठी खंबीरतेने उभे कोणत्याही परिस्थितीत संकटकाळी कसे धावून जावे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. एक शिवसैनिक म्हणून न डगमगता समाजासाठी एकरूपतेने कसे काम करावे व त्यासोबत कुणी जर आपल्या शिवमावळ्यांकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांची गय करायची नाही असे सांगितले. जतच्या पाणीप्रश्न व अनेक मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन हे प्रश्न मांडू असेही सांगितले. तसेच अजिंक्य पाटील यांनी आपल्या मनोगतात जतच्या विविध प्रश्नांसाठी शिवसैनिक एकत्रित येऊन जनतेच्या कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे असे सांगितले व दिनकर पतंगे समवेत सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र कामगार सेना राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी आपल्या भाषणात सर्व जत शिवप्रेमींना एकजुटीचा नारा देऊन सर्वांचे कौतुक केले व जतचा प्रश्न,विभाजनाचा प्रश्न असो, अनेक समस्यांसाठी एकत्रित येऊन काम करूया असे त्यांनी सांगितले.या कामगार सेना संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये अनिल शेटे,मिरज उपतालुका प्रमुख नागनाथ मोटे, जत तालुका युवासेना प्रमुख राजेन्द्र आरळी,जत तालुका कामगार सेना प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ, माजी युवा सेना सांगली उपजिल्हा प्रमुख सागर पाटील, माजी तालुका प्रमुख जत शिवाजी पडोळकर, उमदी उपप्रमुख सुरेश घोडके, जत तालुका शिवसेना उपप्रमुख अशोक पाटील, कामगार सेना उपतालुका प्रमुख रोहीत पाचंगे, युवासेना सरचिटणीस जत तालुका आकाश भिसे, कामगार सेना शहर प्रमुख राजू सावंत, कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्ट जत अध्यक्ष सहदेव माळी, सामाजिक कार्यकर्ते माणतेश ऐवळे, विठ्ठल ऐनापुरे पत्रकार तसेच अनेक शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन