जाडरबोबलाद जि.प.गटातील माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील गटास खिंडार; समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :

जाडरबोबलाद (ता.जत) येथील जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांचे कट्टर समर्थक ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गेजगे व युवा नेते रेवणसिद्ध तेलगाव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते उपजिल्हा प्रमुख तम्मा कुळाल,तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवासेना तालुका प्रमुख नागनाथ मोटे, युवासेना तालुका उपप्रमुख प्रवीण औरादी, तालुका शिवसेना उप प्रमुख श्रीमंत करपे, जाडर बोबलाद विभागप्रमुख रमेश कदम व तसेच संख शिवसेना शहर प्रमुख व्यंकटेश जोशी आणि मेजर सिद्धू गायकवाड या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संख येथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेत प्रवेश करून माजी सभापती, भाजप नेते तम्मनगौडा गौडा रवी पाटील यांच्या वर्चस्वास मोठा धक्का दिला.

यामुळे जत पूर्व भागास तसेच जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटास शिवसेनेस बळकटी मिळणार आहे.
या पक्ष प्रवेशाच्या वेळी जाडर बोबलाद शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश कांबळे, जक्कण्णा कांबळे, विठ्ठल नाटिकार (सोन्याळ )महेश कोळी. कल्लाप्पा साळुंखे (उटगी )इत्यादी उपस्थित होते.यावेळी गेजगे व तेलगाव यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिल्याचे युवासेना तालुका प्रमुख नागनाथ मोटे यांनी मार्गदर्शनपर शिवसेनेची भूमिका व्यक्त करून जाहीर केले.तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे पक्ष संघटना वाढवून हाथ बळकट करण्याचे आवाहन केले.युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण औरादी यांनी आभार मांडले.