
माळशिरस, प्रतिनिधी /संजय हुलगे :
मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था,संघटना,धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून आमदार राम सातपुते यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. यावेळी माळशिरस येथील हनुमान मंदिर समोर टाळ वाजवून मंदिर उघडण्यासाठीआंदोलन केले. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, जिल्हा परिषद सदस्य संजय मोटे माळशिरसचे नगराध्यक्ष विजय देशमुख, माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,सरचिटणीस संजय देशमुख ,अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे ,क्रीडा प्रमुख किशोर तुपसौदर ,युवराज वाघमोडे, शहाजी सरगर, शांतीलाल तरंगे ,नंदू लवटे, राहूल रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन