कोरोनामुळे सर्वाधिक असलेला सांगली जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात: स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे

देवानंद जावीर
सांगली/ प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात सर्व यंत्रणा सज्ज आहे,ऑक्सिजन व्हेंटिलेटर याची कोणतीही कमतरता नाही असे जिल्हाधिकारी सांगत आहेत.मग जगात सर्वात जास्त मृत्यू दर सांगली जिल्ह्याचा कसा? याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे.नव्हे हा मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.
जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले,सांगली जिल्ह्याची कोरोना रुग्णाची संख्या दहा हजाराच्या आसपास पोहचली आहे.मात्र रुग्ण उपचारासाठी बेड देता का बेड असे म्हणून दारोदार हिंडत आहेत.बेड मिळविण्यासाठी लागणारा वेळ आणि व्हेंटिलेटरची अपुरी संख्या यामुळेच मृत्यू दर वाढला आहे.ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची संख्या कमी आहे.जिल्ह्यात शासकिय रुग्णालयात 70 व्हेंटिलेटर आहेत, तर खाजगी रुग्णालयात 47 व्हेंटिलेटर आहेत.म्हणजेच जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या फारच कमी आहे.त्याशिवाय ऑक्सिजन बेडची संख्याही अपुरी आहे.
या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हेलपाटे मारावे लागतात. बेड देता का बेड अशी आर्त हाक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक मारत असतात.यात जाणारा वेळ रुग्णाच्या जीवावर बेतत आहे.हा वेळ कमी झाला तर निश्चित मृत्यू दर कमी होवू शकतो.पण यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल.
सर्व तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असणारी किमान 500 बेडची सोय असणारी हॉस्पिटल उभी करणे आवश्यक आहे.त्याचबरोबर सांगलीत 1000 बेडचे ऑक्सिजन v व्हेंटिलेटरसह सुसज्ज हॉस्पिटल उभे करणे आवश्यक आहे.त्याचबरोबर मिरज लॅबमधून रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत.रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्याने उपचारासाठी दिरंगाई होते.तसेच संबधित रुग्ण रिपोर्ट वेळेवर न मिळाल्याने positive रुग्णही हिंडत बसतात.त्याकाळात ते अनेकांना कोरिनाचा प्रसाद वाटप फिरतात. त्यामुळे रुग्णाची संख्या वाढीला हातभार लागत आहे.
ग्राउंड रियालिटी भयानक आहे.म्हणूनच जगाचा मृत्यू दर 3.41असताना सांगलीचा मृत्यू दर चार टक्के आहे. भारताचा 1.81टक्के तर महाराष्ट्राचा 3.21 टक्के आहे.याचाच अर्थ सांगली जिल्ह्यात सर्व काही आलबेल नाही.यंत्रणा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे किवा जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता शासकीय व खाजगी रुग्णालयात जावून प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. यंत्रणा दुरुस्त केल्याशिवाय गत्यातर नाही.