जत शहरातील कंटेनमेंट झोनमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

अनिल मदने/ जत,प्रतिनिधी:
जत शहरातील प्रभाग ३ मधील नागरिकांनी एकत्र येत आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक निलेश बामणे,गाैतम ऐवळे,संजय कुलकर्णी,रफिक कुरुंदवाड, अंमजद कुरुंदवाड, सुमित कुलकर्णी, संजय शेटे, विरेश पट्टणशेट्टी,जाफर कुरुंदवाड,हरिष शेटे, अमित जाधव,अश्विन शेट्टी, कुमार कोळी,संतोष पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.
शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने येथील परिसर 14 दिवस कंटेनमेंट झोन जाहीर केला होता. 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर येथील नागरिकांनी कोविड योद्धा सिस्टर अंजना साळुंखे व आशा वर्कर राजश्री कोळी, रूपाली कोळी, स्वाती कांबळे व महादेवी कोळी तसेच एम पी डब्ल्यू संजय ढगळे इत्यादी कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला.या कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून 14 दिवस नागरिकांची वारंवार तपासणी करून काळजी घेतली व येथील नागरिकांना कोरोना साथीबद्दल योग्य मार्गदर्शन केले.आरोग्य कर्मचाऱ्यांनी या काळात कोणताही हलगर्जीपणा न करता नागरिकांना योग्य सुविधा दिल्या व काळजी घेतल्याने या परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला.