
खरसुंडी/वार्ताहर:
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे आरोग्य विभागातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, खरसुंडी दूरक्षेत्र पोलीस चौकीचे कर्मचारी,पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच सौ.लता अर्जुन पुजारी व पदाधिकारी,अधिकारी आणि कर्मचारी यांनी तीर्थक्षेत्र खरसुंडी गावात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करून आपल्या सेवेचे योगदान दिल्याबद्दल क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानपत्र,ट्रॉफी,हार,फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदन जावीर म्हणाले,तीर्थक्षेत्र असलेल्या खरसुंडी गावांमध्ये कोरोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी योग्य नियोजन करून चांगली आरोग्य सेवा दिल्यानेच गावातील जनतेला कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूला दूर ठेवणे शक्य झाले आहे.त्यांच्या कार्याचे कौतुक करून गौरव केला जात आहे. संस्थेचे सचिव विक्रम भिसे यांनी प्रास्ताविक केले तसेच आभार मानले. या कार्यक्रमासाठी खरसुंडी गावचे सरपंच लता अर्जुन पुजारी,खरसुंडी दूरक्षेत्र पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संजय पळसकर,पोलीस नाईक संताराम वगैरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय लोंढे , उपसरपंच नितीन पुजारी, ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे,खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, मार्केट कमिटीचे माजी संचालक दिलीप सवणे,डॉ. उमेश पुजारी, कृषी अधिकारी विजय रणदिवे, माजी उपसरपंच जितेंद्र पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम इंगवले, एकनाथ भोसले, ग्रामपंचायत सदस्य सुभाषतात्या केंगार सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि युवक प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर