गोरडवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने रॅपीड व आरटीपीसीआर टेस्ट संपन्न

माळशिरस, प्रतिनिधी/ संजय हुलगे :

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील सर्व परिसर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.माणकी आरोग्य केंद्राच्यावतीने आसपासच्या परिसरातील कोरोना संर्पकातील व्यक्तींच्या कोरोना टेस्ट, कोविड १९ रॅपीड टेस्ट, आर टी पी सी आर टेस्टचा कॅम्प घेण्यात आला.
यावेळी गोरडवाडी, मोटेवाडी(मा),चांदापुरी, कण्हेर,गारवाड,पठाणवस्ती, इस्लामपूर या गावांनी सहभाग नोंदवला.रॅपीड ३२ तर आर टी पी सी आर ३२ अशा एकुण ६४ व्यक्तींच्या टेस्ट घेण्यात आल्या .
यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . सचिन शेंडगे, डॉ.वसंत भोसले,लॅब टेक्नीशन विठ्ठलराव पाटील,आरोग्य सहाय्यक सुनिल कावळे , आरोग्य सेवक रमेश बंडगर,अरविंद भोपळे,विजय कांबळे,आनंद धांईजे,बाळासाहेब ढावरे,आरोग्य सेविका लतीका कोरटकर,अर्चना सोरटे,एस .एस . भोसले,आशा गट प्रवर्तक एस .एस. धांईजे, गोरडवाडीचे सरपंच रामचंद्र गोरड ,पोलीस पाटील नानासाहेब यमगर,ग्रामसेवक रविंद्र पवार,कृषी सहाय्यक विजय लोखंडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यात दिवसभरात २४ कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडले असून तालुक्यातील रुग्णसंख्येने १ हजाराचा आकाडा पार करुन १००८ इतकी रुग्णसंख्या झाली आहे.
आत्तापर्यत ५४६ रुग्ण कोरोनोमुक्त झाले आहेत तर ४४३ रुग्णांनवर उपचार सुरु आहे.तालुक्यात आत्तापर्यत १९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यत ९७१६ पाँझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे.त्यापैकी ६८४४ रुग्ण उपचार घेवून कोरोनामुक्त झाले आहेत,तर २५९७ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात २७५ व्यक्ती कोरोना मुळे मृत्यू पावले आहेत.