मुख्तार मणियार/ औसा, प्रतिनिधी:
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद औसा शाखेने प्रवेश प्रक्रियेतील विविध समस्यांबाबत औसाचे तहसिलदार शोभा पूजारी यांना निवेदन दिले.
प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.औसा तालुक्यातील १ अॉगस्ट पासून महाविद्यालयात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशासाठी आवश्यक असणारे काही कागदपत्रे घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.फक्त त्या कागदपत्रांमुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा प्रवेश राखून धरू नये.त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे ३० टक्के प्रवेश शुल्क सरसगट कमी करण्यात यावे व ते प्रवेश शुल्क एकाच टप्प्यात न घेता ४ टप्प्यात घ्यावे. प्रवेश शुल्काच्या बाबतीत या मागणीसह विचार करून तहसिलदारांनी महाविद्यालयांना सुचना द्याव्यात अशी मागणी अभाविप तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी अभाविपचे तालुका प्रमुख प्रणव नागराळे,शहरमंत्री आकाश डाळिंबे, रोहीत
मैंदरकर,दिपक पवार, मल्लिनाथ मिटकरी, ओंकार अपसिंगेकर, अमरनाथ स्वामी आदि उपस्थित होते.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश