संजय हुलगे,माळशिरस /प्रतिनिधी:
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासाठी विशेषता अनेक वेळा मोर्चे,आंदोलने,उपोषणे झाली.या नामांतराची मागणी धनगर समाजासह अनेक इतिहासकार, सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करणारे नेते यांनी मागणी लावून धरली त्याचे फलित म्हणून तत्कालीन सरकारने विद्यापाठाचे नामांतरण केले.या लढ्यात समाजातील नेत्यांच्या खांद्याला खांद्या लावून एक सुशिक्षित उमदा अभ्यासू तरुण लढवय्या दादासाहेब हुलगे काम करत होता.
दादासाहेब हुलगे हे सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील असून ते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले असून पेशाने शिक्षक आहेत.त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास असून त्यांचा राज्यातील अनेक प्रश्नांचा सखोल अभ्यास आहे.त्यामुळे त्यांच्याकडे अभ्यासू नेतृत्त्व म्हणून पाहिले जाते.त्यांनी नामांतरासाठी काढलेल्या अनेक मोर्चात, आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.त्यांचा धनगर आरक्षणासह समाजातील विविध प्रश्नाचा गाढा अभ्यास आहे. धनगर आरक्षण प्रश्नाबरोबर अनेक प्रश्नावर आवाज उठवला आहे.त्यामुळे त्यांच्यावर समाजाच्या आंदोलनातील अनेक गुन्हेही दाखल आहेत.विशेषता या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्हया पुरतेच मर्यार्दित असून त्यामुळे जिल्हयातीलच अभ्यासू व्यक्तिमत्त्वला स्मारक समितीत संधी मिळाली पाहिजे. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्या फांऊडेशनची स्थापना करून त्या फांऊडेशनच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक काम गेली अनेक केले आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक काम आणि त्यांचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अहिल्यादेवीनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध ठिकाणी मंदिरे, आड,विहीरी,बारवा बांधल्या त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे व येणाऱ्या पुढच्या पिढीला आदर्शवत असणारा ज्ववल इतिहास प्रेरणा म्हणून राहिला पाहिजे यासाठी दादासाहेब हुलगे नेहमी प्रयत्न करत आहेत. अहिल्यादेवीनी बांधलेली मंदिरे, आड,विहीरी,बारवा यांना ते स्वतः भेटी देऊन त्यांचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून संवर्धन व जतन करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे आजपर्यंतचे त्यांचे सामाजिक काम पाहून सोलापूर विद्यापीठाच्या स्मारक समितीत इतिहासाचा गाढा अभ्यासक असणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून दादासाहेब हुलगे यांचा समावेश व्हावा अशी मागणी जीवन बेंगाळ यांनी केली आहे.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश