आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

आटपाडी /प्रतिनिधी :

आटपाडी येथील श्री भवानी एज्युकेशन सोसायटीच्या राजारामबापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आटपाडी येथे संस्थेचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी चेअरमन रावसाहेबकाका पाटील यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी व पोलीस विभागातील अनेक कर्मचारी, कोरोना रुग्णाची सेवा करताना आपल्या प्राणांची आहूती दिली त्याचबरोबर कोरोनामुळे दिवंगत झालेल्या सर्वाना श्रद्धांजली वाहून देशावरचे हे संकट लवकर दूर होवो यासाठी पार्थना केली.
यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज पाटील , मुख्याद्यापक के.बी.जाधव, नितिन डांगे व सर्व शिक्षक उपस्थित होते.स्वागत दादासाहेब मोटे यांनी केले तर आभार एच.एम . चव्हाण  यांनी मानले.