आखिल भारतीय वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या सांगोला तालुका कार्याध्यक्षपदी ह.भ.प.ज्ञानेश्वर घोडके महाराज यांची नियुक्ती;राजमाता कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सत्कार

सांगोला/प्रतिनिधी:

आखिल भारतीय वारकरी सांप्रदायिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी मंडळाच्या सांगोला तालुका कार्याध्यक्ष पदी पाचेगाव बुद्रुक,ता.सांगोला येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर घोडके महाराज यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
राजमाता कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने ह.भ.प.ज्ञानेश्वर घोडके महाराज यांचा सत्कार राजमाता कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ,घोडके गल्ली,पाचेगाव बुद्रुक यांच्या वतीने माजी उपसरपंच,तंटामुक्ती समिती अध्यक्ष साहेबराव घोडके यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रशांत घोडके,प्रसाद घोडके,वैभव घोडके,युवा किर्तनकार ह.भ.प.सुशांत घोडके महाराज,प्रताप पाटील,जालिंदर घोडके,प्रकाश घोडके सर,हिम्मत घोडके,हरिदास घोडके गुरुजी,स्वस्तिक घोडके व निवांत घोडके उपस्थित होते.