अकलूजच्या कोव्हीड हॉस्पिटलचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याहस्ते उदघाटन

संजय हुलगे /माळशिरस,प्रतिनिधी:

कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाजगी दवाखाने ताब्यात घेतल्याने त्याठिकाणी इतर आजारांवरील उपचार घेणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचबरोबर अनेक नामवंत डॉक्टरही कोरोनाग्रस्त झाल्याने माळशिरस तालुका आयएमए, निमा व होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेने अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल शेजारील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये शंभर बेडचे कोरोनाग्रस्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णांना उपचार घेण्यासाठी उभारलेल्या अकलूज कोव्हीड हॉस्पिटलचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते ,जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ ,शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील,जि प च्या सदस्यां शितलादेवी मोहिते-पाटील ,पं .स. उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, , डॉ नितीन करीर , डॉ.एम. के. इनामदार, आयएमए चे अध्यक्ष डॉ नितीन एकतपुरे, निमाचे अध्यक्ष डॉ प्रविण पाटील, होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ पृथ्वीराज माने पाटील , अकलूजच्या प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील , गटविकास अधिकारी स्मिता पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते ,उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ सुप्रिया खडतरे व सर्व डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अकलूज येथे उभारण्यात आलेल्या या कोव्हीड हॉस्पिटलला फक्त अत्यावश्यक सेवेतील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार घेता येणार आहे या व्यतिरिक्त इतर कोरोना बाधीत सामान्य रुग्णांना तालुक्यातील इतर ठिकाणी जी प्रशासनाने कोव्हिड हॉस्पिटल उभारलेली आहेत त्या ठिकाणी उपचार दिले जाणार आहेत . अकलूजचे आय सी यु कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च आला असून रोजचा खर्च जवळपास लाख ते दीड लाख रुपयांच्या आसपास होणार आहे या हॉस्पिटलमध्ये 15 डॉक्टरांच्या टीम विनाशुल्क सेवा देणार आहेत मात्र हाऊसमन नर्सेस आदींना वेतन व विमा संरक्षण दिले आहे या हॉस्पिटल मध्ये कोणतीही सेवा रुग्णाला मोफत दिली जाणार नसून शासनाने जे नियम ठरवून दिले आहेत त्या नियमानुसार फी आकारली जाणार आहे या आयसीयु कोव्हीड हॉस्पिटलला शिवरत्न शिक्षण संस्थेचे नर्सिंग महाविद्यालय व एनजीओ नर्सिंग ब्युरो प्लेसमेंट मार्फत नर्सेसव इतर स्टाफ पुरविला जाणार आहे या आयसीयू कोव्हीड हॉस्पिटल मुळे अकलूज आणि तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल वर येणारा ताण कमी होऊन इतर आजारांवरील रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये लाभ घेणे सोयीचे जाणार आहे . अकलूज मध्ये उभारण्यात आलेले हे आयसीयू कोव्हीड हॉस्पिटल हे राज्यातील खासगी डॉक्टरांनी स्वखर्चाने उभारलेले पहिले हॉस्पिटल असून यामुळे राज्यात इतर ठिकाणीही याचा आदर्श घेतला जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले .