औसा/ मुख्तार मणियार:
औसा तालुक्यातील उजनी,आशिव बोरफळ,किल्लारी, मंगरुळ ,हारेगाव, चिंचोली जोगन, शिवणी लख,तांबरवाडी,कन्हेरी,याकतपूर,किणी,हसेगाव,जवळगावाडी,होळी,हासाळाया गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट भागात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे लिंबाळकर यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला.यावेळी नागरिकांची चर्चा करून कंटेन्मेंट भागातील प्रत्येक कुटुंबाना आर्थिक आसैनिक अल्बम-३० चा रोग प्रतिकारक शक्ती वाढविणा-या गोळयाचे वाटप करण्यासाठी सुपुर्द करण्यात आल्या.

कंटेन्मेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेत देण्यात आल्या. यावेळी जि.प.सदस्य नारायण आबा लोखंडे, राजेंद्र माने,पिंटू माने, तालुका संघटक शेखर चव्हाण, शिवसेना तालुका समन्वयक किशोर जाधव, किशोर भोसले, डॉ सगर, रमेश पाटील, तहसिलदार शोभा पूजारी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ,नायब तहसीलदार शिवाजी कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख,सपोनी विनोद म्हेत्रेवाड, अमोल गुंडे, सरपंच,तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका,आशा कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर