बदलापूर/प्रतिनिधी:
कोरोना महामारीमुळे बदलापूर शहर त्रस्त आहे.आरोग्य सेवा अपु-या पडत आहेत. काॅरंनटाईन सेंटरवर सोयी-सुविधांचा अभाव आहे. नगरपरिषद प्रशासनाने खाजगी हाॅस्पिटल रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्या ताब्यात घ्यावीत.गौरी हाॅल येथे उभारण्यात येत असलेले कोविड हाॅस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यात यावे.रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी बदलापूर शहर प्रवासी संघटनेने प्रशासनाकडे केलेली आहे. कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी 125 बदलापूरकर नागरिकांनी ई मेलद्वारे नगरपरिषदेला पत्र पाठविलेली आहेत. प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घ्यावी, संघटनेचे अध्यक्ष सुधारक पतंगराव याचा पाठपुरावा करत आहेत.तसेच कोविड-19 साठी शासनाकडून आलेला 7 कोटी रुपयांचा सर्व निधी फक्त बदलापूर येथील आरोग्य सेवेसाठी व सोयी-सुविधांसाठीच वापरावा,अशी मागणी बदलापूर शहर प्रवासी संघटनेने प्रशासनाकडे केलेली आहे. नागरीकांचा उद्रेक होणार नाही,याची प्रशासनाने काळजी घ्यावी व रुग्णांना औषधोपचार, सोयी-सुविधा मोफत द्याव्यात.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर