गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित व कायमस्वरुपी करावीत: अन्यथा आंदोलन

वंचितचे साहेबराव चंदनशिवे यांची निवेदनाद्वारे मागणी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील गायरान जमिनीवर समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भटके व विमुक्त गरीब व मागासवर्गीय लोकांनी वर्षानुवर्षे पक्की घरे बांधली आहेत. काहींना घरकुले मिळाली आहेत. सर्वांची ग्रामपंचायतीला नोंदी आहेत. केवळ महसूल नोंद नाही म्हणून अशा परिस्थितीत त्यांचे गायरान अतिक्रमण काढू नये ते नियमित व कायमस्वरूपी करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेकडो मागासवर्गीय लोकांसमवेत वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
समाजातील वाढती लोकसंख्या व गावात अपुरी घरजागा असल्याने त्यातच एका कुटुंबाची अनेक कुटुंबे झाल्याने व स्वतः ची जमीनही नसल्याने मागासवर्गीय लोकांनी गायराणात पक्की व शेडवजा घरे बांधली आहेत. भटके विमुक्त, मागासवर्गीय लोकांना काम केल्याशिवाय दोन वेळचे पोटाला मिळत नाही त्यामुळे विस्थापित झालेल्या व परिस्थितीने असाह्य झालेल्या लोकांच्या घरांची अतिक्रमणे न काढता ती कायमस्वरूपी करण्यात यावीत अशी आग्रही मागणी साहेबराव चंदनशिवे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गायरान जागेतील अतिक्रमणे नियमित व कायमस्वरूपी करा अन्यथा आंदोलन
अरूणभाऊ वाघमारे
तालुक्यातील गायरान जागेतील मागासवर्गीय, उपेक्षी, वंचित, भटके विमुक्तांची अतिक्रमणे नियमित व कायमस्वरूपी करावीत अन्यथा तालुक्यात चक्काजाम करू, तालुका बंद करू, उग्र आंदोलन व निदर्शने छेडण्यात येतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते अरुणभाऊ वाघमारे यांनी दिला आहे.
या निवेदनावर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, ज्येष्ठ नेते अरुण वाघमारे, विद्याधर कांबळे, शैलेश आयवळे,राखीताई खरात, शिवाजी खैरमोडे, आबासाहेब काटे, संतोष वाघमारे, सनी कदम, वर्धमान बाड, अक्षय वाघमारे, आबासाहेब आईवळे, अमित वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, अण्णा भोरे, किरण वाघमारे, ज्योतिर्लिंग काशीद, ऋतिक सावंत, नितीन सावंत,