
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सकाळपासून पक्षातील नेत्यांची मॅरेथॉन बैठक सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर आता अजित पवार हे राजभवनाकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील राजभवनाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे सत्तासमीकरणे बदलणार असून आजच याबाबतचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राजभवनात शपथविधीची तयारी करण्यात आली असून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ असे शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे साथीदारही यावेळी अजित पवारांच्या मागे असल्याचे दिसून येत आहेत.
दरम्यान, अजित पवार यांची सकाळपासून आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक सुरू होती. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती आहे.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
किरण लहमाटे
निलेश लंके
धनंजय मुंडे
रामराजे निंबाळकर
दौलत दरोडा
मकरंद पाटील
अनुल बेणके
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी
अदिती तटकरे
शेखर निकम
निलय नाईक
अशोक पवार
अनिल पाटील
सरोज अहिरे
मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असलेली नावे.
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
आदिती तटकरे
अनिल भाईदास पाटील
बाबुराव अत्राम
संजय बनसोडे

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन