लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयात वन सप्ताहास प्रारंभ

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/लिंगीवरे
लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयात वन महोत्सव सप्ताहास वृक्षदिंडीने व वृक्षारोपणाने प्रारंभ करण्यात आला.


विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.आटपाडी येथील वन विभागाचे वनपाल (खरसुंडी) पांडुरंग नारायण खुपसे व वनसेवक सुखदेव जगन्नाथ माळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

सकाळी विविध रोपांसह व पर्यावरणाच्या घोषणा देत गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर वन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. वेदिका चांगण,अनिकेत तरसे,दिव्या पाटोळे, संजीवनी नामदास या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पर्यावरणाविषयी महत्त्व सांगितले. सहशिक्षक रामराव खटके यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वन महोत्सवाचे महत्व विशद केले.सुरेश पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन केले. सुधीर सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.लक्ष्मण खटके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. हणमंत वळकुंडे,संतराम मदने,धर्मेंद्र मगदूम, ब्रह्मदेव खटके, रामदास जावीर, शहाजी खटके, हणमंत खटके यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.


विद्यालयात वृक्ष चळवळ यशस्वीपणे राबवित असल्याबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल यांचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वनविभाग व विद्यालय प्रशासन यांच्यामध्ये वृक्ष संवर्धनासंदर्भात चर्चा झाली.


या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण PRAGALBHNAYAK News प्रगल्भनायक न्यूज या यूट्यूब चॅनलवरून करण्यात आले असून वृक्षदिंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी https://www.youtube.com/live/5YPN765GFqE?feature=share या लिंकला आणि वन सप्ताह उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम पाहण्यासाठी https://www.youtube.com/live/5PfXLfP9KT0?feature=share या लिंकला क्लिक करून संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह live मध्ये पहा.