इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी

दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या एकता मोरे-पाटील माध्यमिक विद्यालय व इंद्रभाग्य शिक्षण संकुलात आटपाडी पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दिघंची ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विष्णू यादव,आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती बळवंतराव मोरे,
शिक्षण विस्तार अधिकारी अशोक म्हेत्रे,जगन्नाथ कोळपे, सुरेश हस्ते, दिघंची केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी गळवे, लिंगीवरे केंद्राचे केंद्रप्रमुख रुपेशकुमार जंगम, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाभाई तांबोळी, विशेषतज्ज्ञ सचिन हेगडे,सलीम मुलाणी, श्रीरंग वायदंडे,प्रशांत हेगडे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अमित पानसकर,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अनिल मदने,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मलकारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कसबे, इंद्रभाग्य आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश मोरे,पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य पी.आर.कुंभार,आदी मान्यवर उपस्थित होते.
इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्या स्वातीताई मोरे-पाटील यांनी स्वागत केले.सरस्वती मोरे यांनी सूत्रसंचालन केले.ए.बी. जाधव यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध दालनाचे उद्घाटन करण्यात आले.